Friday 1 May 2020

शेळ्यांतील माजाची लक्षणे
    माजावर आलेली शेळी बेचैन असते.
    भूक मंदावते.
    शेपूट सारखे हलविते.
    वारंवार लघवी करते.
    इतर शेळ्यांवर चढते.
    बोकडाशी लगट करते.
    बोकडाचे जननेंद्रिय हुंगते, बोकड/ शेळी तिच्या अंगावर चढल्यास किंवा लगट केल्यास शांतपणे उभी राहते.
    योनिमार्गातून चिकट स्राव येतो.
    माज २४ ते ४८ तास टिकतो.
    प्रतिकूल हवामानात माजाचा काळ लांबतो. क्वचित माज असूनही वरील लक्षणे दिसत नाहीत. अशा माजला मुका माज म्हणतात.
    बोकड मुक्‍या माजावरील शेळीला वासाने ओळखतो.
    बोकडाला नेहमी शेळ्यांपासून वेगळे ठेवावे. शेळ्यांना फळवण्यापुरतेच त्याला शेळ्यांमध्ये सोडावे.

शेळ्यांतील गर्भधारणा अोळखण्यासाठी रासायनिक पद्धत -
शेळीच्या ५ मिली मलमूत्रामध्ये ५ मिली १ टक्के बेरीअम क्‍लोराइड द्रावण मिसळावे. जर तळाशी गाळ साचला व द्रावण गढूळ बनले तर शेळी गाभण नाही असे मानले जाते व द्रावण जर स्वच्छ राहिले तर शेळी गाभण आहे असे मानले जाते. ही पद्धत ठोकळ प्रमाण म्हणून वापरावी.

शेळी गाभण असण्याची लक्षणे
    शेळी २१ दिवसांत परत माजावर येत नाही.
    ३ महिन्यांनंतर शेळीचे पोट वाढू लागते व योनी सुजल्यासारखी दिसते.
    शेळी गाभण झाल्यावर तिची त्वचा तजेलदार होते.
    शेळी गाभण आहे, की नाही हे ओळखण्यासाठी नवीन पद्धतीमध्ये एक्‍स-रे, सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी या तपासण्या खूपच विश्‍वसनीय मानल्या जातात.
    शेळी जर गाभण असेल तर शेळीच्या योनी मार्गातील पेशींमध्ये बदल होतो व तो बदल व्हजायनल सायटोलॉजी (Vaginal Cytology) या पद्धतीने ओळखून शेळी गाभण आहे, की नाही हे ओळखता येते.
    कोणत्याही पद्धतीचा वापर जात, गाभणअवस्था, खर्च व नेमकेपणा यानुसार बदलतो.
    गाभण शेळीची विण्याअगोदर आवश्‍यक काळजी, करडांचे व्यवस्थापन व खाद्य, पाणी व निवारा या गोष्टींच्या योग्य व्यवस्थापनासाठी शेळी साधारणतः कधी विणार आहे व विण्याअगोदर कोणती लक्षणे दिसतात, याबद्दलची माहिती असणे आवश्‍यक आहे.
    पाठ व शेपटीकडील भाग आखडून धरणे.
    कास मोठी होते व चमकल्यासारखी दिसते.
    श्‍वसन हळू, दीर्घ होते व अस्वस्थ दिसते.
    पाठीकडे व शरीराच्या उजव्या बाजूला सारखे वळून पाहते.
    शेळी बैचेन होते व हळू आवाजात ओरडते.
    रोजचा कामगार किंवा मालक जवळ आल्यावर ओरडते.

विलेल्या व दूध देणाऱ्या शेळीचे व्यवस्थापन व काळजी
    शेळी जिथे विली असेल, ती जागा स्वच्छ करून तिथे जंतुनाशकाची फवारणी करून वाराची व्यवस्थित विल्हेवाट लावावी.
    शेळीचा मागचा भाग स्वच्छ धुऊन काढावा.
    जास्त थंडीपासून शेळीचे संरक्षण करावे.
    विल्यानंतर शेळीला चवळी गरम करून, गूळ, मीठ, आले, खनिजमिश्रण हे सर्व खायला द्यावे.
    खुराक दर दिवसाला ५०० ग्रॅमपेक्षा जास्त न देता दोन दिवसांनंतर शेळीच्या आवडीचे खाद्य द्यावे.
    विल्यानंतर शेळी ४० ते ४५ दिवसांनंतर माज दाखवते. ४० ते ४५ दिवसांत माज दाखवल्यानंतर बोकड दाखवावा.
    दूध देणाऱ्या शेळीला ३०० ते ४०० ग्रॅम खुराकाचे मिश्रण १ लिटर दुधासाठी देणे गरजेचे आहे.
    दूध काढण्याअगोदर कास जंतूनाशकाने स्वच्छ करून घ्यावी.
    कासेवरचे केस कापून कोरड्या हाताने पूर्ण दूध काढून घ्यावे.
    गाभण शेळीच्या केसामध्ये नियमित हात फिरवल्यास कातडी चमकदार व नरम राहते.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

शेळ्यांतील माजाची लक्षणे     माजावर आलेली शेळी बेचैन असते.     भूक मंदावते.     शेपूट सारखे हलविते.     वारंवार लघवी करते.     इतर शेळ्यांव...